शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण अन् आता राजकोट किल्ला पर्यटकांसाठी पुन्हा बंद; नेमकं कारण काय?

Rajkot Fort Closed for Tourist | सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये असलेला राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात पडसाद उमटले होते.
त्यानंतर समुद्र किनाऱ्यावर असलेल्या या किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण गेल्या महिन्यातच करण्यात आले. मात्र या पुतळ्याच्या चौथऱ्याच्या बाजूची जमीन खचल्याचा प्रकार समोर आला होता. यावरून विरोधकांकडून टीका देखील करण्यात आली.
चौथऱ्याच्या परिसरातील दुरुस्ती काम करण्यासाठी हा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पुतळ्याच्या चबुतराच्या सभोवताली पदपथाच्या आवश्यक दुरुस्तीसाठी आणि इतर कामे पूर्ण होईपर्यंत रविवार २२ जूनपासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
वैभव नाईक यांची टीका
यावरुन माजी आमदार वैभव नाईक यांनी गेल्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तसं पुन्हा पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल या भीतीनं किल्ला बंद ठेवलाय का? असा सवाल केला आहे.
तसेच १०० कोटी खर्चून १०० वर्षे टिकेल असा पुतळा केल्याचं सरकार सांगत होते. पण आता पर्यटकांसाठी किल्ला बंद केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना अजूनही लक्ष घालावं आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली. Rajkot Fort Closed for Tourist |
दरम्यान, दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल असे सांगितले जात आहे. Rajkot Fort Closed for Tourist |
हेही वाचा:
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली; जेलमध्येच वैद्यकीय पथकाकडून तपासणी





