अदानी, अंबानी कंपनीचे सीनिअर मॅनेजर्स दलित आहे का? राहुल गांधींचा सवाल

Rahul Gandhi । काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते शनिवारी कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी राहुल गांधी यांनी भाजप पक्षावर टीका केली. तसेच अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं
राहुल गांधी म्हणाले,’मी शाखेत असतांना मला दलित अस्पृश्यतेच्या बाबत काहीच मिळालं नाही. फक्त तीन चार लाईनच शाळेत शिकवल्या गेल्या. मी मुर्तीकाराच्या हाताला हात मिळवला, तेव्हा कळलं की या हातात कला आहे. ज्याच्या हातात कला आहे, त्याला मागे बसवलं आहे. हे भारतात चोवीस तास होत आहे. ज्याच्या हातात स्कील आहे. ज्याच्या हातात अनुभव आहे. त्याला तुम्ही न्हावी म्हणा, चांभार म्हणा, वर्कर म्हणा, कारागिर म्हणा. त्याचा इतिहास आपल्या इतिहासात नाही. त्याच्याबाबत काही म्हटलं जात नाही. त्यांनी काय केलं, कसं केलं. त्यांच्याबाबत कसा भेदभाव झाला याची काहीच माहिती नाही” असं राहुल गांधी म्हणाले.
शाळेतील अभ्यासाबाबत बोलतांना ते पुढे म्हणाले,’मी शाळेत दलित आणि मागासांचा इतिहास वाचला नाही. आज उलटं होत आहे. जो काही इतिहास आहे तो मिटवला जात आहे. शिक्षणावर बोलतो तर प्रश्न उठले पाहिजे. शिक्षण संस्थेत कुणाचा कंट्रोल आहे. तुम्ही एज्यूकेशन शिक्षण बघा. सर्वांचं खासगीकरण केलं जात आहे.’
‘दलित ओबीसी कुठेच नाही’
“अदानी, अंबानी कंपनीचे मॅनजर्स पाहा. त्यात सीनिअर मॅनेजर्स दलित आहे का? त्यांचा पगार एक कोटी, 50 लाख असतो. त्यात एक दलित, आदिवासी आणि मागास व्यक्ती दाखवा. मीडियातील मालकांची नावे काढा. त्यात एकही दलित ओबीसी निघणार नाही. मीडियात ग्रोथ, सुपर पॉवरची चर्चा होते. पण दलित ओबीसी कुठेच नाही. ज्युडिशिअरी पाहा, इंटेलिजन्स एजन्सी पाहा, कुठेच दलित, ओबीसी नाहीत” असं राहुल गांधी म्हणाले.





