Pune | शिवाजीनगर ९ अंशांखाली

पुणे,- शहरासह जिल्ह्यातला थंडीचा पारा तब्बल ८ अंशांपर्यंत खाली आल्याने पुणेकर चांगलेच गारठले आहे. यंदाच्या हंगामातील नीचांकी तापामन नोंदवले गेले असून, एनडीए परिसरात सर्वांत कमी ८.९, हवेली येथे ९.१ तर शिवाजीनर परिसरात ९.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस पारा आणखी खाली येण्याची शक्यता असून, थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
दहा दिवसांपूर्वी शहरातील कमाल तापमान ३० अंशांपुढे तर किमान तापमान १७ अंशांवर होते. मात्र, मागील चार दिवसांत किमान तापमानात पाच ते सहा अंशांनी घट झाली आणि पारा ११ ते १२ अंशापर्यंत खाली आला. त्यामुळे बोचरी थंडी जाणवू लागली. परंतू, गेल्या ४८ तासांत किमान तापमान आणखीन घटले आणि शहराचा पारा एक आकडी ९ अंशावर आला. बुधवारी (दि. २७) सकाळी शहरातील एनडीए परिसरात नीचांकी ८.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ हवेली आणि शिवाजीनगर परिसरातही किमान तापमान ९ अंश सेल्सिअस इतके नोंदविले.
उबदार कपडे वापरण्याचे आवाहन
थंडीचा काडाका वाढल्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या. मात्र, मागील दोन दिवसात थंडीचा वाढलेला जोर अणि पुढील दोन दिवस किमान व कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. उब देईल असे स्वेटर, कानटोपी, हातमोजे घालावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान (अंश से.) एनडीए – ८.९, हवेली – ९.१, शिवाजीनगर – ९.९, पाषाण आणि दौंड – १०.२, माळीण १०.६, बारामती – १०.८, आंबेगाव – ११, तळेगाव – ११.६, पुरंदर – ११.८, इंदापूर – १२.१, राजगुरूनगर – १२.५, शिरूर – १३.४




