‘शिवप्रेमींवर गुंडगिरी करायची नाही…’; नारायण राणेंच्या ‘त्या’ धमकीला जितेंद्र आव्हाडांचं जोरदार प्रत्युत्तर

Jitendra Awhad । Narayan Rane । Statue Collapse : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मालवणमध्ये महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. यादरम्यान ठाकरे आणि राणे यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. पोलिसांकडून यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
किल्यावर आदित्य ठाकरे असतांना नारायण राणे आणि निलेश राणे दाखल झाले. यावेळी स्थानिक पोलिसांनी राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पायथ्याशीच थांबविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान, राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी निलेश राणे यांनी उपस्थित पोलिसांना शकत ताकत दिली.
ते म्हणाले आम्ही आमचा वेळ पोलिसांना दिला होता आणि तरीही हे कस काय घडलं हे बाहेरून येऊन अंगावर येत आहे? हे बाहेरून येऊन अंगावर येणार का असा प्रश्नही निलेश राणे यांनी उपस्थित केला. त्यांना गुपचूप निघायला सांगा असेही ते म्हणाले. पोलिसांना निलेश राणे पुढे म्हणाले, आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लावायचा नाही. पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना हात लावायचा नाही. असेही राणे यांनी सांगितले.
तर खासदार नारायण राणे यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ’यापुढे आमचे पोलिसांना असहकार्य असेल. त्यांना येऊ दे. त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी द्या, मी एकेएकाला बघतो, घरात रात्रभर ठेचून एकेकाला मारुन टाकेन. कोणालाही सोडणार नाही.’ अशी संतप्त प्रतिक्रिया राणेंनी दिली. मात्र, आता नारायण राणे यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन विरोधकांकडून त्यांच्यावर निशाणा साधला जातोय.
जितेंद्र आव्हाड यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला आहे. आव्हाड म्हणाले, “घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” ही भाषा आहे माजी केंद्रीय मंत्र्यांची ! तीही कोणासाठी, तर राजकोट किल्ल्यावर जमलेल्या शिवप्रेमींसाठी.! एक तर भ्रष्टाचार करायचा, आणि त्यातून नुकसान झालं, तो उघड झाला की ही गुंडगिरी करायची.
“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” ही भाषा आहे माजी केंद्रीय मंत्र्यांची ! तीही कोणासाठी, तर राजकोट किल्ल्यावर जमलेल्या शिवप्रेमींसाठी..!
एक तर भ्रष्टाचार करायचा, आणि त्यातून नुकसान झालं, तो उघड झाला की ही गुंडगिरी करायची. भाजपच्या नादाला लागलेल्या या मंत्र्यांनी कोकणासह… pic.twitter.com/zsYeDWBhgO
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 28, 2024
भाजपच्या नादाला लागलेल्या या मंत्र्यांनी कोकणासह महाराष्ट्रातील तमाम मराठी लोकांनाही लाज वाटेल असं आज कृत्य केलंय. पक्षाला वाचवायच्या नादात यांची गुंडगिरी एवढी वाढलीये की राज्यातील नेत्यांनाही धमकावण्यापर्यंत यांची मजल गेलीये. बरं आता यांना वाचवायला कायदा आणि सुव्यवस्था डोळे झाकून राहणार यात काही नवल नाही. राज्याचा खेळखंडोबा करून ठेवलाय..! या आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.





