Maharashtra politics : कोकणात शिंदें पाठोपाठ आता राष्ट्रवादीही शिवसेनेच्या मुळावर; ठाकरेंचा हुकमी एक्का तटकरेंनी फोडला

मुंबई : विधानसभा निडवणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. यानंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गेल्या काही दिवसांपासून एका मागे एक धक्के बसताना दिसत आहेत. विशेषकरून कोकणातून दिग्गज नेते ठाकरेंची साथ सोडत आहेत. अशातच आता रायगडमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. Uddhav Thackeray |
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. शेडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. रविवारी रोहा येथील राम मारुती चौकात झालेल्या जाहीर सभेत शेडगे यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. Shivsena UB |
समीर शेडगे हे रोहा तालुक्यातील प्रभावी नेतृत्व आणि संघटन कौशल्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे रायगडमधील स्थानिक पातळीवरील पक्षाची ताकद कमकुवत होण्याची शक्यता आहे. या पक्षांतरामागे स्थानिक राजकारणातील बदलते समीकरण आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा प्रभाव असल्याची राजकीय चर्चा आहे. शेडगे यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
आज रोहा येथे माजी नगराध्यक्ष तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रोहा तालुका अध्यक्ष समीर शेडगे यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष या नात्याने सर्व नेत्यांचे पक्षात हार्दिक स्वागत करून त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी… pic.twitter.com/NwnxGXyzHk
— Sunil Tatkare (@SunilTatkare) April 13, 2025
प्रवेश सोहळ्यात बोलताना सुनील तटकरे यांनी शेडगे यांचे स्वागत केले. ते म्हणाले, समीर शेडगे यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. तसेच या पक्षप्रवेशामुळे रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद अधिक वाढणार आहे. तसेच आदिती तटकरे यांनीही शेडगे यांच्या निर्णयाचे कौतुक केले आणि कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
संजना घाडींचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि उपनेत्या, प्रवक्त्या संजना घाडी यांच्यासह मागाठाणे विधानसभेतील अनेक उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, शाखाध्यक्ष आणि युवा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. १४) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. माजी नगरसेवक राम रेपाळे यांनी घाडी दाम्पत्याचा शिवसेनेत – प्रवेश घडवून आणला. यावेळी विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. Sanjana Ghadi |




