Chhatrapati Sambhaji Nagar : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5 मतदारसंघात उमेदवार ठरले आहेत. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या पाचही उमेदवारांना तयारी करण्याचे पक्षांकडून आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. या उमेदवारांना लवकरच एबी फॉर्म दिले जाणार आहेत. कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी ? छत्रपती संभाजीनगर मध्य – किशनचंद तनवाणी छत्रपती संभाजीनगर पश्चिम – राजू शिंदे वैजापूर मतदारसंघ – दिनेश परदेशी कन्नड मतदारसंघ – उदयसिंह राजपूत सिल्लोड मतदारसंघ – सुरेश बनकर पाचही मतदारसंघातील 2019 चे निकाल जाणून घ्या – छत्रपती संभाजीनगर मध्य : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे प्रदीप शिवनारायण जयस्वाल 82217 मते मिळवून विजयी झाले होते. एमआयएमचे नसिरूद्दीन ताकीउद्दीन सिद्दीकी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यांच्या विजयातील मतांचे अंतर 13892 इतके होते. छत्रपती संभाजीनगर पश्चिम: 2019 च्या विधानसभा निवडणुकीत येथे शिवसेना पक्षाचे संजय पांडुरंग शिरसाट 83792 मते मिळवून विजयी झाले होते. अपक्ष राजू रामराव शिंदे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यांच्यातील विजयाचे अंतर 40445 मते इतके होते. वैजापूर मतदारसंघ : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत येथे शिवसेनेचे रमेश नानासाहेब बोरनारे 98183 मते मिळवून विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभय कैलासराव पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यांच्यातील मताचे अंतर 59163 इतके होते. कन्नड मतदारसंघ : 2019च्या विधानसभा निवडणुकीत येथे शिवसेनेचे उदयसिंह सरदारसिंग राजपूत यांनी 79225 मते मिळवून विजय मिळवला होता. अपक्ष हर्षवर्धन जाधव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यांच्यातील विजयाचे अंतर 18690 इतके होते. सिल्लोड मतदारसंघ : 2019 च्या विधानसभा निवडणूकीत येथे शिवसेनेचे अब्दुल सत्तार 1 लाख 23 हजार 383 मते मिळवून विजयी झाले होते. अपक्ष प्रभाकर माणिकराव पालोदकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यांच्यातील विजयाचे मतांचे अंतर 24381 इतके होते.