Shiv Sena Symbol Crisis : ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा तारीख पे तारीख!आता ‘या’ तारखेला होणार सुनावणी

नवी दिल्ली – महाराष्ट्रात सुरु असलेला सत्ता संघर्ष एका टोकाच्या वळणावर येऊन पोहचला आहे. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय अशा दोन्ही ठिकाणी सुरु असलेला हा संघर्ष केवळ महाराष्ट्राचीच नाही तर देशासाठी लक्षवेधी ठरत आहे. न्यायालयातील सुनावणी जरी फेब्रुवारी महिन्यात होणार असली तरी आज निवडणूक आयोगासमोर शिवसेना कोणाची ? आणि धनुष्यबाण कोणाला मिळणार याबाबतची सुनावणी पार पडली.
धनुष्यबाण कुणाचे या प्रश्नाभोवती गेल्या चार महिन्यांपासून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये वाद शिगेला पोहोचला आहे. याच मुद्यावर आज निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडली. धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याचा फैसला पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. आयोगाने पुन्हा पुढची तारीख दिली आहे. पुढची सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे.
आज, धनुष्यबाण चिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे की बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळणार या प्रकरणावर आज निवडणूक आयोगात सुनावणी झाली. दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद झाला. यावेळी शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी तर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी युक्तीवाद केला.
या सुनावणीदरम्यान, ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान म्हटलं आहे. फुटीच्या आरोपात तथ्य नाही. ही केवळ कल्पना आहे. शिंदे गटाची खरी शिवसेना नसून पक्षात फूट पडली आहे ही केवळ कल्पना आहे. शिंदे गट हे वास्तव नाही. सेनेतील फुटीला काहीही अस्तित्व नाही, असं सांगतानाच आपल्या विधानांचा पाठपुरवठा करणारी कागदपत्रं सिब्बल यांनी सादर केली. तसे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत चिन्हासंदर्भातील निर्णय देऊ नये अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर केली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/45-thousand-900-crore-investment-in-the-state-on-the-first-day-in-davos-about-10-thousand-direct-employment-opportunities/
तर, शिंदे गटाकडे पुरेसं संख्याबळ आहे. एखादा गट बाहेर पडला तर त्यात गैर काय आहे. आमदार, खासदारांची जास्त संख्या आमच्याकडे आहे. बहुसंख्येकडे नेणारी आकडेवारी महत्त्वाची आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/bjps-anup-gupta-wins-chandigarh-mayor-polls-by-1-vote/
तसेच निवडणूक आयोगामध्ये जमा केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात यावी, ओळखपरेड करण्यात यावी अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली. तर कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नाही असं सांगत शिंदे गटाने धनुष्यबाण आपल्यालाच मिळावा अशी मागणी केली.





