शिवसेना गटनेते कलाटे यांना करोनाची लागण
Updated On:

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना करोनाची लागण झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी प्रभागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला होता. तसेच महापालिकेतील विविध बैठकांना ते उपस्थित होते. त्यामुळे त्यांचा अनेकांशी संपर्क आला होता. त्यांचा तपासणी अहवाल सोमवारी आला. त्यामध्ये त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. लोकप्रतिनिधी असल्याने लॉकडाऊनच्या काळामध्ये कलाटे नागरिकांच्या संपर्कात होते. त्यानंतर अनलॉकिंग सुरु झाल्यानंतरही विविध बैठकांनाही ते उपस्थित होते. सोमवारी सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.





