पिंपरी | वडगावमध्ये शिवजयंती महोत्सावास सुरूवात

वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – सोमवारपासून (दि. २५) पासुरू सुरू झालेल्या व २८ मार्चपर्यंत साजऱ्या होणाऱ्या राजे शिवछत्रपती शिवजयंती महोत्सवासाठी रंगमंचाचे पूजन करण्यात आले. तसेच महोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला.
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात २५ ते २८ दरम्यान शिवजयंती महोत्सव साजरा होत आहे. त्यासाठीच्या रंगमंचाचे भूमिपूजन उत्सव समितीचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर व अध्यक्ष अनंता कुडे यांच्या हस्ते करण्यात आले.
पोटोबा देवस्थानचे विश्वस्त तुकाराम ढोरे, किरण भिलारे, पंढरीनाथ भिलारे, सुभाष जाधव, नारायण ढोरे, माजी सरपंच संभाजीराव म्हाळसकर, खंडूशेठ भिलारे, कार्यक्रम प्रमुख अतिश ढोरे, अतुल म्हाळसकर, कुलदीप ढोरे, वसंतराव भिलारे, रोहिदास गायकवाड, काशिनाथ भालेराव, शंकरराव पगडे, सोमनाथ काळे, देवानंद पवार, बाळासाहेब सोनवणे, सुरेश गुरव, संदीप कुंभार, समीर गुरव, संतोष भालेराव आदी उपस्थित होते.





