कटके, शिंगटे, एर्नाक, देवडिगा यांना शिवछत्रपती पुरस्कार
Updated On:

पुणे – महाराष्ट्र राज्य सरकारने 2018-19 या वर्षासाठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे. पुण्याचा कुस्तीपटू अभिजित कटके, प्रो-कबड्डीत वर्चस्व गाजविणारा महाराष्ट्राचा गिरीश एर्नाक व रिशांक देवडिगा, महिला कबड्डीपटू सोनाली शिंगटे आणि हॉकीपटू आकाश चिकटे यांच्यासह एकूण 48 खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. कुस्ती प्रशिक्षक पंढरीनाथ पाठारे यांना जीवनगौरव तर बाळासाहेब आवारे यांना कुस्तीसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली.




