शिरुर: सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलचे भव्य स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात पडले पार

शिरूर – शहरातील सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. १ फेब्रुवारीची रम्य संध्याकाळ, ग्राऊंडवर भव्य उभारलेला रंगमंच, प्रेक्षकांंनी प्रचंड तुडुंब भरलेले मैदान, रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट, बालकलाकारांची लगबग, धावपळ अनेक विशेष मान्यवरांची उपस्थिती आणि बालकलावतांच्या अदाकारीने प्रेक्षकांंच्या टाळ्यांच्या होणारा कडकडाट, असे विलोभनीय दृश्य सेंट जोसेफ इंटरनॅशनल शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचे पाहायला मिळाले.
केजी पासून ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय मनापासून दिलखुलासपणे सादर केले. अगदी साठच्या दशकापासून ते आजच्या लोकप्रिय गाण्यांपर्यंत कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. एकापेक्षा एक कलाकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या होत्या. प्रेक्षकांनी टाळ्याच्या कडकडात विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
संस्थेचे अध्यक्ष अनिलजी पायस आणि संस्थेच्या सचिव नॅन्सी पायस तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी अतिशय आत्मविश्वासाने सादर केले. सर्व इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर कलाकृती सादर केल्या होत्या. कार्यक्रमात विविध स्पर्धत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला आहे. ‘न भूतो न भविष्यती ‘ असे हे स्नेहसंमेलन असल्याचे उद्गार उपस्थित प्रेक्षकांनी काढले.
सदर कार्यक्रमासाठी न्यायमूर्ती दत्तात्रय डोमले, गटविकास अधिकारी महेश डोके, गटशिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर , सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक करांडे,आदर्श माजी सरपंच अरुणजी घावटे, सरपंच शिल्पा गायकवाड माजी सरपंच विठ्ठल घावटे ,नाथाभाऊ पाचर्णे, मनसेचे अविनाश घोगरे, क्लेरीसा मास्करीनस , पीटर गुडीनो,अँलन पायस, जेष्ठ पत्रकार नितीन बारवकर, अरुणकुमार मोटे, संस्थेचे अध्यक्ष अनिल पायस, सचिव नॅन्सी पायस, संस्थेचे सदस्य सुनील भाकरे ,अनिता वेगस व मान्यवर, पालकवर्ग मोठया उपस्थित होते. संस्थेच्या सचिव नॅन्सी पायस यांनी सर्व उपस्थितांचे तसेच शिक्षक व शिक्षकेतर वर्गांचे आणि बालकलावंतांचे आभार मानले.





