Nhavare News : शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना; १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
Nhavare News : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात दिवाळीच्या काळात किरकोळ कारणांवरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याच्या दोन स्वतंत्र घटना उघडकीस आल्या आहेत.

Nhavare News : शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट मारहाणीत झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. आंबळे येथील काजळे वस्तीवर घरासमोर फटाके वाजविण्यास मनाई केल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबांत तुफान मारहाण झाली. (Nhavare News)
तर रांजणगाव सांडस येथे मुलासोबत बोलत असल्याच्या कारणावरुन एका तरुणाला लोखंडी रॉड आणि लाकडी स्टंपने मारहाण करण्यात आली. या दोन्ही घटनांमध्ये एकूण १६ जणांविरुद्ध शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Nhavare News)
रांजणगाव सांडस येथे तरुणाला लोखंडी रॉड व स्टंपने मारहाण…
पहिली घटना १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास रांजणगाव सांडस येथील जिल्हा परिषद शाळेजवळ घडली. राहुल सूर्यभान धनवट (वय २९, रा. खांडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) हे त्यांचा मुलगा कार्तिक याच्यासोबत बोलत असताना रविंद्र राणू मोरे, विजय राणू मोरे व राणू मारुती मोरे यांनी त्यांना मुलासोबत बोलण्यास मज्जाव केला. (Nhavare News)
यातून झालेल्या वादानंतर रविंद्र मोरे याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या दोन्ही हातांच्या दंडावर मारहाण केली, तर विजय मोरे याने लाकडी स्टंपने डोक्यावर, हातांच्या दंडावर व छातीवर प्रहार करुन दुखापत केली. (Nhavare News)
तसेच राणू मोरे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत. (Nhavare News)
आंबळे येथे फटाक्यांच्या कारणावरुन दोन कुटुंबांत संघर्ष…
दुसरी घटना ११ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री आठच्या सुमारास आंबळे येथील काजळेवस्तीवर घडली. फिर्यादी अक्षय हिरामण शिंदे यांच्या घरासमोर शेजारी राहणारा निलेश निघुल हा फटाके वाजवत होता. (Nhavare News)
घरात लहान बाळ असल्याने फिर्यादी यांनी घरासमोर फटाके न वाजवता थोडे दूर जाऊन फटाके वाजविण्याची विनंती केली. मात्र, याच गोष्टीचा राग आल्याने निलेश निघुल याने फिर्यादी यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. (Nhavare News)
त्यानंतर निलेश निघुल याच्यासह कैलास निघुल, वैभव जाधव, अर्जुन जाधव, सचिन जाधव, रविंद्र मुरकुटे, निळकंठ मुरकुटे, सुनिल शिंदे, राजाराम जाधव, शिवानी निघुल, सुनिता जाधव, रेश्मा जाधव व सुमन मुरकुटे यांनी काठी व कुऱ्हाड हातात घेऊन फिर्यादी यांच्या घरासमोर जमाव केला. (Nhavare News)
यावेळी फिर्यादी, त्यांचे आई-वडील, भाऊ व पत्नी यांना शिवीगाळ व दमदाटी करत हाताने, लाथाबुक्क्यांनी, काठीने तसेच कुऱ्हाडीने मारहाण करत दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर करीत आहेत. (Nhavare News)




