शिरूर पोलीसांनी अवैध दारू वाहतूक करणारा ट्रक पकडला; 75 लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरूर – शिरूर बोऱ्हाडे मळा येथे गोव्याहून महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी अवैध दारूची वाहतूक करणारा ट्रक शिरूरच्या पोलीस पथकाने पकडला असून त्याच्याकडून १ हजार ५० बॉक्स रॉयल ब्लू दारू किंमत ६० लाख ४८ रुपयांची व पंधरा लाख रुपयांच ट्रक असा एकूण ७५ लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असून एक जणाला अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मोहम्मद इम्रान मोहम्मद सलिम शेख (वय ३७, रा. घाटकोपर मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे ट्रक चालकाचे नाव नाव आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार शेखर झाडबुके यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, आज दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळच्या दरम्यान न्हावरा फाटा येथे शिरूर पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस अंमलदार शेखर झाडबुके व पोलिस अंमलदार आप्पासाहेब कदम हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चौफुल्यावर शिरूर कडे येणाऱ्या ट्रकमध्ये दारूची वाहतूक होत आहे.
ही माहिती पोलीस कर्मचारी झाडबुके व कदम यांनी शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना सांगितली. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस अंमलदार शेखर झाडबुके, आप्पासाहेब कदम, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस हवालदार निरज पिसाळ या पथकाने बोऱ्हाडे मळा येथे बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून चौफुला शिरूर रस्त्याहून शिरूर कडे येणारा ट्रक क्रमांक एम एच ४८ सी बी ३६०५ याचा चालक पोलिसांना पाहताच संशयास्पद हालचाल करू लागला त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आल्याने पोलिसांनी ट्रक थांबवला त्यावेळेस त्यातून दारूचा वास येत असल्याचे पोलिसांना समजले.
ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये जुन्या कपड्यांच्या गाठोडे पाठीमागे दारू सारखे बॉक्स दिसून आले. त्याची पाहणी केली असता ट्रकमध्ये गोव्याहून आणलेली गोवा रॉयल ब्ल्यू दारूचे १०५० बॉक्स रॉयल ब्ल्यू दारूचे बॉक्स किंमत ६० लाख ४८ हजार रुपये व 15 लाख रुपये, ट्रक असा एकूण ७५लाख ४८ ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रकचा चालक याला ताब्यात घेतले असून शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.





