Shirur News : शिरूर पोलीस ठाण्याच्या पो.निरीक्षकपदी विनोद पाटील यांची नियुक्ती; गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हान
शिरूर (Shirur News) पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी विनोद पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला असला, तरी त्यांच्या खांद्यावर तालुक्यातील वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची विक्री, घरफोड्या, वाहनचोरी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Shirur News : शिरूर (Shirur News) पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी विनोद पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला असला, तरी त्यांच्या खांद्यावर तालुक्यातील वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची विक्री, घरफोड्या, वाहनचोरी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
शिरूर (Shirur News) तालुक्याची वाढती लोकसंख्या, औद्योगिक वसाहतींचा विस्तार आणि पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाढती वर्दळ लक्षात घेता पोलीस प्रशासनासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत.
गत काही महिन्यांपासून शिरूर तालुक्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराच्या घटना वाढल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची चिंता सामाजिक संघटना व्यक्त करत असून, ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. त्यामुळे नवनियुक्त पोलीस निरीक्षकांना ड्रग्ज माफियांविरोधात निर्णायक मोहीम उघडण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
याशिवाय शहर व ग्रामीण भागात घरफोड्या, दुचाकी चोरी, शेतमाल चोरी, विदयुत रोहीत चोरी आणि इतर मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाणही चिंतेचा विषय ठरत आहे. रात्रीच्या वेळी वाढणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या गुन्ह्यांचा छडा लावून सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे हेही पोलीस प्रशासनासमोरचे महत्त्वाचे आव्हान आहे.
शिरूर शहरात (Shirur News) वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक, मॉडिफाईड सायलेंसर, ट्रिपल सीट आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतूक शिस्त लावण्यासोबतच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, शिरूर तालुक्यातील नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि सामाजिक संघटनांनी नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. गुन्हेगारांवर कठोर कारवाई, ड्रग्जमुक्त शिरूर, चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
“ड्रग्ज माफिया, चोरट्यांवर वचक बसवून कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्याचीच खरी कसोटी”
शिरूर (Shirur News) पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर विनोद पाटील यांना केवळ गुन्ह्यांचा तपासच नव्हे, तर वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्या कार्यपद्धतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






