Shirur News : महाराष्ट्रात सध्या ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे (Shirur News) अतोनात नुकसान झाले असून, कांदा, गहू, हरभरा, डाळिंब , तरकारी पिके व केळीच्या पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Shirur News) झाल्याने शेतकरी देशोधडीला लागले आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस सतर्कतेचा इशारा दिला असून, शेतपिकांचे पंचनामे करण्याची मागणी जोर धरत आहे. राज्यात ऐन उन्हाळ्यात हवामान बदलामुळे अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मागील काही दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात पडणाऱ्या पावसामुळे शिरूर तालुक्यासह बेट भागातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. Shirur News शिरूर (Shirur News) तालुक्याच्या बेट भागात काठापूर खुर्द, पिंपरखेड, जांबूत, चांडोह, फाकटे, वडनेर खुर्द परिसरात अवकाळी पावसाने सर्वाधिक फटका बसला असून यामध्ये प्रामुख्याने डाळिंब, आंबा, कलिंगड, कांदा, गहू आणि हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.वादळी आणि गारपीठ यामुळे केळीची केळीच्या बागा, गव्हाची शेते आणि कांद्याची शेते जमीनदोस्त झाली असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता आता वाढल्याचे दिसून येते. काढणीस आलेला कांदा, गहू आणि हरभरा पावसामुळे भिजल्याने शेतकऱ्यांचे डोळ्यात पाणी आले आहे. अनेक शेतकरी बांधवांनी कर्ज काढून लागवड केली होती, मात्र या पावसाने स्वप्नांवर पाणी फिरवले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या विविध भागांत पुढील २-३ दिवस पूर्वमोसमी शक्यता वर्तविण्यात असून शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागात पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून या परिस्थितीत अवकाळी, गारपीट आणि वादळाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या बळीराजाला मदतीची नितांत गरज असल्याचे दिसून येते.