Shirur : गुंठेवारीच्या संशयास्पद दस्तांना अभय कोणाचे? तक्रारीनंतरही चौकशी रखडल्याचा आरोप
Shirur : शिरूर तालुक्यातील संशयास्पद जमीन दस्तांची दौंड व केडगाव येथे नोंदणी झाल्याची तक्रार. चौकशी होत नसल्याचा गणेश कडू यांचा आरोप; स्वतंत्र तपासणीची मागणी.

Shirur : शिरूर तालुक्यातील संशयास्पद जमीन दस्तांची नोंदणी दौंड आणि केडगाव येथे झाल्याच्या तक्रारीमुळे नोंदणी विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत. तक्रार करूनही चौकशी होत नसल्याचा आरोप तक्रारदार गणेश कडू यांनी केला आहे. सह जिल्हा निबंधक प्रवीण देशपांडे हे भोसले यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही कडू यांनी केला आहे.
शेतीच्या जमिनींचे छोटे तुकडे करून विक्री करताना तुकडेबंदी व तुकडेजोड कायद्याचे पालन झाले का, हा या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा आहे. संबंधित दस्तांची नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे, परवानग्या आणि जमिनीच्या नोंदी तपासल्या होत्या का, याची चौकशी होण्याची गरज आहे.
दस्त नोंदविला म्हणजे व्यवहारातील सर्व कायदेशीर अटी पूर्ण झाल्या, असे मानता येत नाही. त्यामुळे शिरूर ते दौंड या संपूर्ण दस्तसाखळीची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे खुलासे आणि फेरफार नोंदी तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी न झाल्यास महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची भेट घेऊन दाद मागणार असल्याचे गणेश कडू यांनी सांगितले. आता वरिष्ठ अधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.





