Shirur Crime : भांडण मुलासोबत, राग आईवर! चांडोहमध्ये तरुणांची दादागिरी, भांडण सोडवणाऱ्या महिलेला केली मारहाण

प्रभात वृत्तसेवा
शिरूर – चांडोह (ता. शिरूर) येथे किरकोळ वादातून महिलेस व तीच्या मुलाला व सुनेला शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आदित्य हरीभाऊ पानंमद आणि ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिवाजी रोकडे (दोघे रा. चांडोह ता. शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांडोह येथील कुणाल गोडसे यांच्यासोबत शुक्रवारी (दि.31) सायंकाळच्या सुमारास आदीत्य पानमंद व ज्ञानेश्वर रोकडे यांचा किरकोळ वाद झाला.
या किरकोळ वादाचा राग मनात धरून पानंमद आणि रोकडे यांनी गोडसे यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ व दमदाटी केली. त्यावेळी कुणालची आई रेश्मा गोडसे या भांडण सोडविण्यासाठी आल्या व त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना व त्यांच्या सुनेला शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. त्यावेळी आदित्य पानंमद याने त्यांच्या हाताला चावा घेऊन दुखापत केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. रेश्मा गोडसे (रा. चांडोह) यांनी याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.या प्रकरणाचा तपास शिरूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल आगलावे हे करीत आहेत.



