शिरूर : गणेगाव खालसातील ‘त्या’ व्यक्तीचा कोरोना अहवाल पाँझिटिव्ह

रांजणगाव गणपती (प्रतिनिधी) : गणेगाव खालसा ता. शिरुर येथील मुंबईहून गावात आलेल्या कोरोना संशयीत व्यक्तीचा शासकीय वैद्यकीय अहवाल पाँझिटिव्ह असल्याची माहिती रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी डाँ. स्नेहल घोडेवार यांनी दिली.
संबधित व्यक्ती मुंबईहून गणेगावला आली आहे. तब्येतीत बिघाड झाल्यावर शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यावर संबधित रुग्णालय प्रशासनाने कोरोनाची तपासणी केली असता अहवाल पाँझिटिव्ह आला असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले होते. सदर व्यक्तीस पुढील वैद्यकीय उपचारासाठी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हाँस्पिटलला दाखल केले असता वैद्यकीय अहवाल पाँझिटिव्ह असल्याचे व कुटुंबातील इतर चार जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी डाँ. स्नेहल घोडेवार यांनी दिली. त्यामुळे गणेगाव खालसा गावात प्राथमिक आरोग्य विभाग, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याचे ही घोडेवार यांनी सांगितले.
दरम्यान, गणेगाव खालसा येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार गणेगाव खालसा परिसर प्रतिबंधक क्षेञ म्हणुन घोषित करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले.





