शिरूर : तालुक्यात नागरिक बेशिस्त मात्र मद्यपीं शिस्तीतच !

Updated On:

शिरूर : तालुक्‍यात आज सकाळपासूनच नागरिकांनी बेशिस्तीचे दर्शन घडवले असताना येथील तळीराम मात्र शिस्तीत होते. त्यामुळे शिरूर शहरात नागरिक बेशिस्तीत तर तळीराम शिस्तीत अशी म्हणण्याची वेळ आली आहे. याची चर्चा आज शिरूर शहरामध्ये सुरू होती. शिरूरच्या सर्व व्हाट्सअप, फेसबुक ग्रुप वर , टिकटॉक वर शिरूरच्या तळीरामांच्या लांब लागलेल्या लाईनचे व्हिडिओ पोस्ट होत होते.

तळीरामांच्या या सोशल डिस्टन्स गर्दीला पाहण्यासाठी शहरातील अनेक नागरिक येत होते. कोरोना व्हायरसमुळे गेल्या दीड महिन्यापासून दारूची दुकाने बंद होती. त्यामुळे तळीरामांची मोठी तारांबळ होत होती.

त्यात आज दारूची दुकाने सुरू होणार असल्याने तळीरामांनी दुकानासमोर केली गर्दी होती.शिरूर शहरात एकमेव वाईन शॉपचे दुकान असून येथे आज दुकान उघडल्यापासून तळीरामांची एकच गर्दी झाली. मात्र, तळीरामांनी यावेळी शिस्तीचे आणि सोशल डिस्टन्सचे कडेकोट पालन केले. त्यामुळे शिरूर शहरात नागरिकांच्या बेशिस्तीचे तर तळीरामांची शिस्तीचे दर्शन आज शहरातील नागरिकांना झाले.

आणखी संबंधित बातम्या

Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका

2026-05-17 19:03:58

Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका

Lockdown in India: देशात लॉकडाउन लागू होणार का? ; केंद्र सरकारने केली 'ही' घोषणा, वाचा केंद्रीय मंत्री काय म्हणाले ?

2026-03-27 12:08:16

Lockdown in India: देशात लॉकडाउन लागू होणार का? ; केंद्र सरकारने केली 'ही' घोषणा, वाचा केंद्रीय मंत्री काय म्हणाले ?

COVID-19 cases : २०२५ मध्ये कोविड मृत्यूंमध्ये मोठी वाढ; आकडा ऐकून उडतील होश !

2025-12-12 18:39:36

COVID-19 cases : २०२५ मध्ये कोविड मृत्यूंमध्ये मोठी वाढ; आकडा ऐकून उडतील होश !

Shirur News : शिरूर शहरात स्टीमरूम कॅफेमध्ये विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; पालक वर्ग संतप्त, पोलिस कारवाईची मागणी

2025-11-20 08:11:34

Shirur News : शिरूर शहरात स्टीमरूम कॅफेमध्ये विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; पालक वर्ग संतप्त, पोलिस कारवाईची मागणी

Pune Crime : उधारीवर दारू न दिल्याने संतापला दारुडा..; वाईन शॉप कामगाराला मारहाण, पोलिसांनी काढली धिंड!

2025-06-17 19:33:41

Pune Crime : उधारीवर दारू न दिल्याने संतापला दारुडा..; वाईन शॉप कामगाराला मारहाण, पोलिसांनी काढली धिंड!