Shirdi News : धक्कादायक ! शिर्डीमध्ये तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
Updated On:

शिर्डी : शिर्डीतील साई आश्रया अनाथाश्रमाचे संस्थापक गणेश दळवी यांचा २० वर्षीय मुलगा शिवम दळवी याचा पिंपळवाडी गावातील तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली असून, यामुळे शिर्डी परिसरात शोककळा पसरली आहे.
पिंपळवाडी गावात ग्रामपंचायतीच्या मालकीचे पाण्याचे तळे आहे. शिवम हा नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळी फिरण्यासाठी तळ्याच्या परिसरात गेला होता. हात-पाय धुण्यासाठी तळ्याजवळ गेला असता, त्याचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला.
ही घटना रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत शिर्डी आणि राहाता नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. दरम्यान, अथक प्रयत्नांनंतर रात्री उशीरा शिवमचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढण्यात आला.





