Shedgevadi News : चव्हाणवाडीच्या युवकाचा अपघाती मृत्यू
Shedgevadi News : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.

Shedgevadi News : चव्हाणवाडी (ता. शिराळा) येथे चारचाकी गाडीने धडक दिलेल्या अपघातातील जखमी मोटार सायकलस्वाराचे गुरुवारी रात्री उपचार सुरू असताना निधन झाले. तर जखमी मुलीवर उपचार सुरु आहेत. घटनेची नोंद अद्याप पोलिसात दाखल झालेली नाही. (Shedgevadi News)
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, चव्हाणवाडी येथील सचिन ज्ञानदेव पाटील (वय ३५) हे युवक बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मोटार सायकल (एम एच १० ए व्ही २७३६) वरुन सहा वर्षीय कन्येसह शेडगेवाडी येथे जात होते. (Shedgevadi News)
मोटारसायकल बादेच्या शिवारात आली असता शेडगेवाडीहून कराडकडे चाललेल्या चारचाकी (एम एच १० सी ५४४१) गाडीने समोरुन येणाऱ्या मोटार सायकलला जोराची धडक देऊन शेजारच्या शेतात घुसली. (Shedgevadi News)
या अपघातात मोटार सायकलवरील सचिन पाटील गंभीर जखमी झाल्याने तसेच मुलीच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना कराड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी रात्री उपचार सुरु असताना मृत्यू झाला. (Shedgevadi News)
चारचाकी गाडी आरळा येथील येथील असून शेडगेवाडी येथील विजेंद्र अकॅडमी येथील एका भारतीय सेनेत उत्तीर्ण झालेल्या युवकाच्या मिरवणुकीसाठी आली होती. मिरवणूक संपल्यानंतर शेडगेवाडीहून कराड कडे जात असताना हा अपघात झाला. (Shedgevadi News)





