Hormuz strait : होर्मूझमधील जहाजांची वाहतूक थांबवली; एका जहाजावर केला हल्ला
होर्मूझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या एका जहाजावर प्रोजेक्टाईलचा मारा झाल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीने या सागरी मार्गाने होणारी जहाजांची वाहतूक थांबवली आहे.

Hormuz strait – होर्मूझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या एका जहाजावर प्रोजेक्टाईलचा मारा झाल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीने या सागरी मार्गाने होणारी जहाजांची वाहतूक थांबवली आहे. संयुक्त राष्ट्राच्या पाठिंब्याने या मार्गाने काही तेल वाहतूकीच्या टँकरने प्रवास केल्यानंतर गुरुवारी हा हल्ला झाला होता.
पर्शियन आखातामध्ये अडकून राहिलेल्या जहाजांना सामुद्रधुनीमधून बाहेर काढण्यासाठी ओमानच्या सहकार्याने या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली होती.
मात्र या मार्गाने जहाजांची सुरक्षित वाहतूक केली जाण्याबद्दलची हमी मिळेपर्यंत ही वाहतूक थांबवण्यात येत असल्याचे इंटरनॅशनल मेरीटाईम ओर्गनायजेशनच्या प्रमुखांनी म्हटले आहे.
ओमानच्या किनाऱ्याजवळ एका जहाजावर प्रोजेक्टाईलचा मारा कोणी केला, हे समजू शकलेले नाही. या पर्यायी मार्गाने इराणच्या परवानगीशिवाय जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करण्याचा इशारा इराणने दिला होता. त्यानंतर काही तासातच हा हल्ला झाला होता.
इराणने जहाजांना परवानगी देण्यासाठी पर्शियन गल्फ ओॅथोरिटी या नवीन प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या एजन्सीने निश्चित करून दिलेल्या मार्गाने जाणाऱ्या जहाजांना सुरक्षिततेची हमी नसल्याचे एजन्सीने म्हरटले होते.
पर्यायी मार्गाने जहाजांना मार्ग खुला करून दिल्याने जागतिक अर्थकारणावरील ताण कमी होणार असून अमेरिकेबरोबर इराणच्या सुरूअसलेल्या चर्चेदरम्यान शांतता राखण्यासही मदत होणार आहे.
या नवीन मार्गाने जहाजांच्या सुरक्षा हमीची जबाबदारी अमेरिका घेत असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आखाती देशांच्या दौऱ्यादरम्यान सांगितले होते.





