“स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत तरी शिंदेंना मुख्यमंत्री…”; गुलाबराव पाटील यांचे विधान

Gulabrao Patil | राज्यातील मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स अद्यापही संपलेला नाही. यातच एकनाथ शिंदे हे गृह खात्यासाठी आग्रह असल्याचे वृत्त समोर येत आहे. यावरून आता शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहायला पाहिजे, असे विधान गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील ?
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळालं असतं तर फायदा झाला असता पण आमच्या नेतृत्वानेच सांगितले, माझी कुठलीही आडकाठी राहणार नाही. शेवटी आम्ही एकनाथ शिंदे यांचे आदेश पाळणारे शिवसैनिक आहोत. एकनाथ शिंदेंनी सत्तेत राहावं, त्यासाठी उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रिपद त्यांना दिलं जावं. एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय नेतृत्व आणि येथील नेतृत्वाशी चांगले संबंध आहेत त्यामुळे त्यांचा सन्मान राखला जाईल,” असे गुलाबराव पाटील म्हणाले.
“केंद्रीय नेत्यांकडे आम्ही गृहमंत्रिपदाची मागणी केली आहे. जे केंद्रीय नेते निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं स्वत: एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावे ही सगळ्यांची इच्छा होती. शेवटी ३ पक्षांचे सरकार आहे, तिन्ही पक्षाचे समतोल साधण्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतला त्यामागे आम्ही आहोत,” असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.
संजय राऊत चिकनगुनियासारखे…
“संजय राऊतांनी आतापर्यंत शिवसेना संपवली, राष्ट्रवादी संपवली, उद्धव ठाकरेंना संपवलं, काँग्रेसलाही संपवलं. संजय राऊत चिकनगुनियासारखा आहे. हा कुणाचा नाही, नौटंकी बोलणे, बाळासाहेब बोलतात त्यासारखं बोलण्याचं नाटक करणे. उद्धव ठाकरे यांना चुकीच्या माहिती देऊन वेडे केले. आज परिस्थिती शिवसेना २० आमदारांवर आणून ठेवली आहे,” असा टोला गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना लगावला. Gulabrao Patil |
महायुतीत नाराजीनाट्य नाही
महायुतीत नाराजीनाट्य नाही. पण मागणी करणे चुकीचे नाही. केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल ते मान्य करु, आजारपणामुळे ते २ दिवस गावी गेले होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनतील असं जनतेला वाटत होते. आम्ही सगळे अधिकार एकनाथ शिंदेंना दिलेत, ते जे काही ठरवतील आम्ही त्याचे पालन करू, असं गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केले आहे. Gulabrao Patil |
हेही वाचा:





