Maharashtra Politics : ‘उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार ? शिंदे गटाच्या आमदाराच्या विधानाने खळबळ
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या (NCP Merger) चर्चांनी जोर धरलेला असतानाच, आता "दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का?" या चर्चेला अचानक उधाण आले आहे.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच आता दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का, याबाबतही राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. अशातच शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेल्या एका सूचक विधानामुळे या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. (Maharashtra Politics)
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र आले, तर तीच खऱ्या अर्थाने दिवाळी असेल, असे रघुवंशी यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेनेत दोन गट पडायला नको होते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. (Maharashtra Politics)
‘पक्षात फूट पडायला नको होती’
दोन्ही शिवसेना एकत्र येणार की नाही, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे स्पष्ट करत रघुवंशी म्हणाले की, शिवसेनेत ज्या दिवशी फूट पडली, तो दिवस दुर्दैवी होता. पक्षाचे दोन गट व्हायला नको होते, असे आपल्याला पहिल्या दिवसापासून वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. ()Maharashtra Politics
दोन्ही शिवसेना एकत्र येणार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनंतर आता शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याचा विषयही चर्चेत आला आहे. त्यातच सत्ताधारी शिंदे गटातील आमदारानेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकत्र यावे, अशी भावना व्यक्त केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
मात्र, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय किंवा घोषणा झालेली नाही. रघुवंशी यांच्या विधानावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात, तसेच भविष्यात याबाबत काही राजकीय हालचाली होतात का, याकडे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)





