Shilpa Shetty Dance: अक्षय खन्नाच्या गाण्यावर शिल्पा शेट्टीचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल

Shilpa Shetty Dance: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा अंदाज बांधणं कठीण असतं. सध्या नवीन गाण्यांइतकीच जुन्या गाण्यांवरही कलाकार रील्स आणि डान्स व्हिडीओ करताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने केलेला एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर विशेष चर्चेत आला आहे.
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटातील Fa9la या गाण्यावर शिल्पा शेट्टीने डान्स केला असून, या गाण्यात अभिनेता अक्षय खन्ना याने सादर केलेल्या स्टेप्स तिने तंतोतंत साकारल्या आहेत. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ शेअर करताना शिल्पा शेट्टीने चित्रपटातील कलाकारांना टॅग करत त्यांचे मनापासून कौतुक केले आहे. तसेच दिग्दर्शक आदित्य धर यांच्याविषयीही तिने प्रशंसा व्यक्त केली आहे. “मी या गाण्याची आणि चित्रपटाची मोठी चाहती झाले आहे,” असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
व्हिडीओच्या शेवटी शिल्पा आपल्या टीमशी संवाद साधताना दिसते, ज्यामुळे हा क्षण आणखीनच खास वाटतो. चाहत्यांनी कमेंट्स करत तिच्या डान्स स्टाईल, फिटनेस आणि एनर्जीचे भरभरून कौतुक केले आहे.
दरम्यान, शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय असते. फिटनेस, योगा आणि आरोग्यविषयक टिप्स ती नेहमीच चाहत्यांशी शेअर करत असते. तिचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.





