Sheikh Hasina : शेख हसीना यांच्या मूळ गावी उसळला हिंसाचार
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे मूळ गाव असलेल्या गोपालगंज आणि आजूबाजूच्या भागांमध्ये आज पुन्हा हिंसाचार उसळला.

Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे मूळ गाव असलेल्या गोपालगंज आणि आजूबाजूच्या भागांमध्ये आज पुन्हा हिंसाचार उसळला. सत्तारुढ पक्षाच्या एका स्थानिक कार्यकर्त्याच्या हत्येनंतर रात्रभरातून हा हिंसाचार सुरू झाला. एक पोलीस स्थानक आणि सत्तारुढ पक्षाच्या आमदाराचे घर पेटवून देण्यात आले.
गोपालगंजला लागून असलेल्या फरिदपूर भागातल्या भांगा परिसरामध्ये आवामी लीगचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये मंगळवारी संध्याकाळी झालेल्या संघर्षादरम्यान बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या स्थानिक शेतकरी आघाडीचे नेते राजू मोल्लाह यांची हत्या झाली. आवामी लीगचे समर्थक असल्याच्या संशयावरून काही जणांना अटक झाल्यानंतर गोपालगंजचा उपजिल्हा असलेल्या तुंगीपारा भागात या हिंसाचाराला (Sheikh Hasina) सुरुवात झाली होती.
नंतर हिंसाचाराचे लोण अन्य भागात आणि शेजारच्या फरिदपूरच्या काही भागांमध्ये पसरले. त्यातूनच बीएनपीचे कार्यालय आणि काही मोटरसायकली पेटवून देण्यात आल्या. बीएनपीचे गोपालगंजमधील आमदार एसएम झिलानी यांच्या घरावर आंदोलक चाल करून आले, तेंव्हा त्यांचे कुटुंबीय आणि अन्य लोकांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
आवामी लीगच्या समर्थकांनी दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या (Sheikh Hasina) कारवाईच्या निषेधार्थ उग्र निदर्शने केली होती. यावेळी पोलिसांच्या वाहनांची मोडतोड देखील झाली होती. त्यानंतर प्रशासनाने जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त, पोलीस अधिक्षक आणि तंगीपारा पोलीस स्थानकाच्या प्रभारींना हटवले आहे. हिंसाचार करणाऱ्यांची व्हिडीओ फुटेजच्या आधारे ओळख पटवून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे गृहमंत्री सलाउद्दीन अहमद यांनी म्हटले आहे.






