Sheikh Hasina : शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी कोणतीही मुदत नाही; भारताने केले स्पष्ट
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या प्रत्यार्पणासाठी भारत कोणतीही मुदत देऊ शकत नाही, असे भारताच्यावतीने आज स्पष्ट करण्यात आले.

Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या प्रत्यार्पणासाठी भारत कोणतीही मुदत देऊ शकत नाही, असे भारताच्यावतीने आज स्पष्ट करण्यात आले. हसीना यांच्या प्रत्यार्पणाची विनंती बांगलादेशाने भारताकडे केली असून त्या प्रक्रियेच्या कायदेशीर बाबींचा अभ्यास केला जात असल्याचे बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांनी आज सांगितले.
ढाका येथे एका वार्तालापादरम्यान त्यांनी मुदतीबाबतच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरात ही भूमिका स्पष्ट केली. हसीना (Sheikh Hasina) यांना भारतीय हवाई दल किंवा लष्कराने भारतात आणले नव्हते.
जुलै उठाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंदोलनांनी त्यांचे सरकार उलथवून टाकल्यानंतर, ५ ऑगस्ट रोजी बांगलादेश हवाई दलाच्या विमानाने हसीना यांना भारतात आणले होते. त्या भारतात आल्या, तेव्हा त्या (Sheikh Hasina) बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. त्यामुळे त्यांना आश्रय देणे हे भारताचे कर्तव्यच होते, याकडे त्रिवेदी यांनी लक्ष वेधले.






