इतकी पटपट बोलली की….; नोरा फतेही इंग्रजी बोलण्यावरून झाली ट्रोल! व्हायरल व्हिडीओची जोरदार चर्चा

Nora Fatehi : अभिनेत्री नोरा फतेही अभिनयासोबतच तिच्या डान्स तसेच अनोख्या स्टाइलमुळे सतत चर्चेत असते. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे नोरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली असून या व्हिडीओमुळे तिला ट्रोल केले जात आहे.
नोरा फतेहीला ‘दिलबर’ या गाण्यामुळे मोठी प्रसिद्ध मिळाली. या गाण्यानंतर तिची लोकप्रियता प्रचंड वाढली. त्यानंतर आलेल्या साकी साकी, गर्मी, कमरिया आणि नाच मेरी रानी अशी हिट गाणी अशा काही हिट गाण्यांमुळे तिच्या लोकप्रियेत आणखी भर पडत गेली. नोराचा चाहतावर्ग देखील मोठा असून, तिच्या आगामी नव्या गाण्याच्या प्रतिक्षेत चाहतावर्ग असतो. खरंतर नोराने डान्सवर खूप मेहनत घेऊन स्वतःचे नाव इंडस्ट्रीत तयार केले आहे.
नोरा की अंग्रेजी ऐसी की खुद इंग्लिश को डर
Aaiyoooooo…….. happy 😊नोरा फतेही (Nora Fatehi) : कनाडा में जन्मी एक प्रसिद्ध डांसर, एक्ट्रेस और मॉडल हैं, जिन्होंने भारतीय फिल्म इंडस्ट्री में अपनी पहचान बनाई है।
बॉलीवुड में डेब्यू किया 2014 में फिल्म Roar: Tigers of the… pic.twitter.com/Gld3JGjwI6
— Manisha (@manisha31843) October 12, 2025
यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. काही हिंदी सिनेमात तिने अभियन देखील केला आहे. ग्लॅमरस दुनियेत तिच्या हरएक गोष्टीविषयी चर्चा होत असतात. ती अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असते. कार्यक्रमावेळी पापाराझींंना पोझ देत आपले फोटोशूट करते. आता सोशल मीडियावर नोराचा पापाराझींसोबत बोलण्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, या व्हिडीओत नोराच्या इंग्रजी भाषेवरून तिला ट्रोल केले जात आहे.
या व्हिडिओत पापाराझींना तुम्ही आनंदी आहात? असा प्रश्न ती करते. हे तिने सगळ्यानांच विचारल्याचे व्हिडीओत दिसत आहे. पण तिचे बोलून झाल्यानंतर ती नेमकं काय बोलली हे कोणालाच कळत नाही. तिच्या बोलण्यातील टोन आणि इंग्रजी भाषा यामुळे उपस्थित असणाऱ्या पापाराझींमध्ये हशा पिकाल्याचे दिसते. तिच्या या बोलण्यावरून काहींना वाटते की नोराच्या इंग्रजी टोन accent आहे तर काहींना attitude असल्याचे देखील वाटत आहे.
हेही वाचा : “आम्ही लढण्यास घाबरत नाही, गरज पडली तर…,” ; ट्रम्पच्या १००% टॅरिफवर चीनचे सडेतोड उत्तर





