आई-वडिलांच्या कर्जमाफीसाठी मुलीकडे ‘ती’ मागणी ; नकार दिल्याने आरोपीकडून मुलीवर चाकूहल्ला

डोर्लेवाडी : बारामतीतील एका दाम्पत्याने घेतलेल्या कर्जाच्या मोबदल्यात त्यांच्या मुलीकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, तरुणीने या मागणीला विरोध केल्याने तिच्यावर आरोपी तरुणाने चाकू हल्ला करून त्या तरुणीला जखमी केल्याचा प्रकार समोर आलाय.
गुरुवारी सकाळी बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात एका १९ वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी दत्तात्रय चंद्रकांत कुंभार (रा. भैय्यावस्ती मळद, ता. बारामती) याच्यावर पोस्कोसह बाल लैंगिक बारामती) याच्यावर पोस्कोसह बाल लैंगिक अत्याचार व विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय कुंभार याने तरुणीच्या आई वडिलांना कर्ज व उचल स्वरुपात काही पैसे दिले होते. दरम्यान, आरोपीने हे पैसे माफ करतो असं म्हणत त्यांनी त्याच्या मुलीकडे यांच्याकडे शरिरसुखाची मागणी केली.
यावेळी फिर्यादी तरुणीने आरोपीला नकार दिला. त्यानंतर आरोपीने चाकुने तरुणीच्या मानेवर वार केले. तसेच पोटामध्ये चाकु खुपसण्याचा प्रयत्न करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या जबाबावरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली एस.डी.पी.ओ. राठोड करीत आहेत.





