Shashi Tharoor : पाकिस्तानची भूतकाळातील गैरकृत्ये कशी पुसता येतील? शशी थरूर यांचा सवाल
पश्चिम आशियात युद्धविराम घडवण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. मात्र, त्या कार्यात (Shashi Tharoor) भारताची कुठलीही भूमिका नाही, अशी तुलना केली जात आहे.

Shashi Tharoor : अमेरिका आणि इराणमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका निभावत आहे. तसे असले तरी पाकिस्तानची भूतकाळातील गैरकृत्ये कशी पुसता येतील, असा बिनतोड सवाल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी केला.
पश्चिम आशियात युद्धविराम घडवण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. मात्र, त्या कार्यात (Shashi Tharoor) भारताची कुठलीही भूमिका नाही, अशी तुलना केली जात आहे.
त्या पार्श्वभूमीवर, पत्रकारांशी बोलताना थरूर यांनी महत्वाचे भाष्य केले. मध्यस्थाच्या भूमिकेचा विचार करता भारताची पाकिस्तानशी कुठली स्पर्धा असल्याचे वाटत नाही.
पाकिस्तान आणि इराण शेजारी देश आहेत. त्यांच्यात ९०० किलोमीटर लांबीची सीमा आहे. युद्ध चिघळल्यास निर्वासित पाकिस्तानमध्ये जातील. त्यामुळे आताच्या खेळात पाकिस्तानची भूमिका भारतापेक्षा (Shashi Tharoor) वेगळी आहे, असे त्यांनी नमूद केले.
अर्थात, पाकिस्तानने मध्यस्थाची भूमिका निभावण्यात कुठली हरकत नसल्याचेही थरूर यांच्या वक्तव्यातून प्रतिबिंबित झाले. शांतता प्रस्थापित होणार असेल तर ती घडामोड कुणामुळे घडतेय ते फारसे महत्वाचे नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली.






