DMK । तामिळनाडूचे परिवहन मंत्री आणि द्रमुक नेते एसएस शिवशंकर यांच्या वादग्रस्त विधानावरून राजकीय खळबळ उडाली आहे. भगवान रामाच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही. असे विधान शिवशंकर यांनी केले आहे. यावर आता भाजप पक्षातील नेत्यांनी पलटवार केला आहे. हिंदुस्थानविरोधी भूमिकेबद्दल भाजपने इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
भाजपने म्हटले की, ‘इंडिया आघाडीचा हिंदुविरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. इंडिया आघाडीचे एकच ब्रीदवाक्य आहे. हिंदूंना दोन शिव्या, तुम्हाला व्होट बँकेकडून टाळ्या मिळतील. नुकतेच राहुल गांधी म्हणाले होते की, हिंदू हिंसाचार आहे. रामजन्मभूमी आंदोलनाचा पराभव झाला. तसेच कर्नाटकातील रामनगरचे नामकरण करण्यात आले. टीएमसीचा जय श्री रामला विरोध आहे. सपा, राजदने राम चरित मानसला वादग्रस्त भाष्य केले. द्रमुकने सनातन निर्मूलनाची हाक दिली. काँग्रेसने राम मंदिराला विरोध केला.’ असं म्हणत भाजपने इंडिया आघाडीवर टीका केली आहे.
DMK । प्रभू रामाच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही – शिवशंकर
चोल सम्राट राजेंद्र चोल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना द्रमुक नेते शिवशंकर म्हणाले की, ‘अयोध्येच्या राम मंदिराला 3000 वर्षांचा इतिहास असल्याचे म्हटले जाते. भगवान राम 3000 वर्षांपूर्वी येथे वास्तव्यास होते परंतु त्यांच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही. राम अवतार असता तर तो जन्माला आला नसता, तो जन्माला आला असता तर देव होऊ शकला नसता. भगवान रामाचा इतिहास शोधण्यासाठी आपल्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. त्यांच्या या विधानामुळे राजकारण तापले आहे.
DMK । शिवशंकर यांच्या वक्तव्यावर अण्णामलाई नेमकं काय म्हणाले…
शिवशंकर यांच्या वक्तव्यावर तामिळनाडू भाजप अध्यक्ष अन्नामलाई म्हणाले की, ‘द्रमुकमध्ये अचानक आलेला रामाचा आवेश पाहण्यासारखा आहे. द्रमुकचे लोक फार लवकर विसरतात. चोल वंशाच्या सेंगोलची स्थापना करण्यासाठी द्रमुकनेच पंतप्रधान मोदींना विरोध केला होता. शिवशंकर यांना प्रभू रामाबद्दल थोडी माहिती मिळावी.