Aditi Rao Hydari : रणबीरसोबत काम करण्याचा अनुभव शेअर करत आदिती राव हैदरी म्हणाली “तो तुम्हाला…”
Aditi Rao Hydari : याविषयी चर्चा सुरू असताना अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने रणबीरसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

Aditi Rao Hydari : बॅालिवूडमध्ये आपल्या विविधांगी भूमिकांमुळे अभिनेता रणबीर कपूर सतत चर्चेत असतो. सध्या तो बहुप्रितिक्षित रामायण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला जबरदस्त प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळाला असून, आता चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटात रणबीर प्रभू श्री राम यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
एकीकडे त्याच्या चित्रपटाची उत्सुकता असून दुसरीकडे रणबीर कपूरची प्रभू श्री राम यांच्या अवतारातील झलक समोर आल्यानंतर अनेकांनी नापसंती दर्शवली होती. याविषयी चर्चा सुरू असताना अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने रणबीरसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
खरंतर रणबीरने आतापर्यंत अनेक कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्री अदिती राव हैदरी हिचे देखील नाव येते. रॅाकस्टार या चित्रपटात अदितीने रणबीरसोबत काम केले होते. अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने रणबीर कपूरसोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला.
रणबीर कपूरसोबत काम करण्याबद्दलचा आपला उत्साह व्यक्त करताना अदिती म्हणाली, “रणबीरसोबत काम करणे अप्रतिम होते. तो अप्रतिम आहे, खरंच अप्रतिम. तो माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे आणि तो कामाच्या वेळी पूर्णपणे त्यात रमून जातो. तो तुम्हाला कोणतीही गोष्ट पटवून देऊ शकतो.”
आदिती राव हैदरीचे बॅालिवूड चित्रपटांमधील काम पाहिल्यास तिने सतत साच्यापलीकडच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या गांधी टॅाक्स या चित्रपटातील साकारलेल्या भूमिकेतील अभिनयाचे कौतुक करण्यात आले होते.
हा चित्रपट मूक डार्क कॉमेडी चित्रपट आहे. ती आता प्राईम व्हिडिओच्या ‘वेलकम टू खोया महल’ या मोठ्या प्रोजेक्टमध्ये एका वेगळ्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. कोंकणा सेन शर्मा आणि जयदीप सरकार यांनी निर्मित केलेल्या या आगामी मालिकेत बरुण सोबती आणि रचित सिंग या कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.
रामायण हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग दिवाळी २०२६ ला, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता यश रावणाची भूमिका साकारत आहे. साई पल्लवी सीतेची आणि सनी देओल हनुमानाची भूमिकेत दिसणार आहे. रवी दुबे रामाचे भाऊ लक्ष्मण यांची भूमिकेत असून रकुल प्रीत सिंग शूर्पणखेच्या भूमिकेत असणार आहे.





