“तुमच्या शरीराची…” हटके सल्ला दिल्याने प्राजक्ता माळीचा नवा लूक चर्चेत

मुंबई – जुळून येती रेशीम गाठी या टीव्हीवरील प्रसिद्ध मालिकेतून घरा घरात पोहचलेली प्राजक्ता माळी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती थेट चाहत्यालाच रिप्ले देते तर कधी योगाचा अप्रतिम व्हिडीओ शेअर करते. आता देखील अशाच एका कारणामुळे प्राजक्ता चारसहत आली आहे. प्राजक्ताने आपल्या इंस्टावर काही हॉट अंदाजात फोटो शेअर केले आहेत. परंतु या फोटोसोबाबत लिहिलेलं कॅप्शन सध्या चांगलच लक्षवेधी ठरतंय.
प्राजक्ता माळी आपल्या फिटनेसची वारंवार काळजी घेत असते. नुकतेच तिने काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने डार्क ब्राऊन रंगाचा स्टायलिश ड्रेस परिधान केला आहे. त्यासोबतच पफ हेअर स्टाईल आणि कानामध्ये सुंदर अशा रिंग्ज घातल्याचे पाहायला मिळत आहे. फोटो शेअर करताना प्राजक्ताने म्हटलंय, सेनोरिटा… जर तुमच्या शरीराची ठेवणं उत्तम असेल तर नक्कीच फ्लोन्ट करा.
View this post on Instagram
प्राजक्ताच्या या लूकवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाला केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रान बाजार’ या मराठी वेब सिरीजमध्ये प्राजक्ता दिसली होती. यासोबतच ती महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये सूत्रसंचालन देखील करताना दिसून येते.





