पंजाब नॅशनल बॅंकेचा शेअर कोसळला
Updated On:

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बॅंकेचा एकूण व्यवहार जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कमी झाल्यामुळे आज या बॅंकेच्या शेअरच्या भावात 11 टक्क्यांपर्यंत घट झाली.
बॅंकेचा नफा मात्र 78 टक्क्यांनी वाढून 1105 कोटी रुपये इतका झाला आहे. एकूण व्यवसाय कमी होऊन 21,262 कोटी रुपये रुपये इतका झाला. त्यामुळे आगामी काळामध्ये बॅंकेचा नफा कमी होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटते. बॅंकेच्या ढोबळ अनुत्पादक मालमत्तेत या कालावधीत बरीच वाढ झाली आहे.





