Oil companies Shares: ‘या’ कारणांमुळे ONGCसह तेल कंपन्यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर
Oil companies Shares:

Oil companies Shares: अमेरिकेत बर्फवृष्टी झाल्यामुळे तेल उत्पादन आणि निर्यात कमी झाली आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळेही तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत खनिज तेलाचे दर वाढत असल्यामुळे खनिज तेल उत्पादन आणि शुद्धीकरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ होत आहे.
ओएनजीसी कंपनीच्या शेअरचा भाव दहा टक्क्यांनी वाढल्यामुळे या कंपनीच्या शेअरचा भाव आता 52 आठवडाच्या उच्चांकावर आहे. अमेरिकेत बर्फ दृष्टीमुळे तेल उत्पादन 15 टक्क्यांनी म्हणजे 20 लाख पिंपांनी कमी झाली आहे. त्यामुळे अमेरिकेतून तेलाची निर्यात थंडावली आहे. त्याचबरोबर कजाकिस्तानमधील तेल उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे तेलाच्या किमती वाढत आहे.
अमेरिकेतील विमानवाहू जहाजे मध्यपूर्वेत दाखल झाली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर हल्ला करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत खनिज तेलाच्या उत्पादनावर आणि पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या परिस्थितीत ऑल इंडिया या कंपनीच्या शेअरचा भाव दहा टक्क्यांनी वाढून 492 रुपये प्रति शेअर या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर गेला. गेल्या पाच दिवसात या कंपनीच्या शेअरचा भाव 11 टक्क्यांनी वाढला आहे. तर या महिन्यात या कंपनीच्या शेअरचा भाव 18 टक्क्यांनी वाढला आहे.
हेही वाचा – Industrial production: डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन 7.8% वर; दोन वर्षांची उच्चांकी झेप




