Share Market : आखातात इराणने विविध देशांच्या तेल आणि नैसर्गिक वायू प्रकल्पाच्या पायाभूत सुविधा (Share Market) उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जागतिक ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत जागतिक शेअर बाजाराबरोबरच (Share Market) भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक गुरुवारी कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 2,496 अंकांनी म्हणजे 3.26 टक्क्यांनी कोसळून 74,207 अंकावर बंद झाला. जून 2024 नंतर निर्देशांक प्रथमच एका दिवसात इतका कोसळला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 775 अंकांनी म्हणजे 3.26 टक्क्यांनी कोसळून 23,002 अंकावर बंद झाला. ईटर्नल, बजाज, महिंद्रा, एचडीएफसी बँक, लार्सन अँड ट्यूबरो, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. खनिज तेलाचे दर 114 डॉलरच्या जवळपास गेले आहेत. इराणने कतार आणि कुवेतमधील नैसर्गिक वायू प्रकल्पावर हल्ले केले आहेत. इराणने सौदी अरेबियाच्या नैसर्गिक वायू आणि तेल प्रकल्पावरही हल्ले चढविल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शेअर बाजारावर नोंदलेल्या 3,192 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली तर 1,051 कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ होऊ शकली. Share Market Today: जियोजीत वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की काल अचानक इराण आणि इस्त्राईलने तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रावर हल्ले सुरू केल्यानंतर जगभर असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. दक्षिण कोरिया, शांघाय, हाँगकाँग, युरोप, अमेरिका येथील शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळल्यानंतर भारतीय शेअर बाजारातही सकाळपासून विक्रीचा जोर वाढला होता. अगोदरच अस्थिर असलेले परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री वाढवित असून बुधवारी या गुंतवणूकदारांनी 2,714 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 3,253 कोटी रुपयांच्या शेअरची (Share Market) खरेदी करून निर्देशांकांना आधार देण्याचा प्रयत्न केला क्षेत्र घट मिडकॅप 3.34% स्मॉल कॅप 2.77% वाहन 4.5 % रिअॅल्टी 4% वित्तीय सेवा 3.75% इंडस्ट्रियल्स 3. 49% सेवा 3.44% आयटी 3.41%