Share Market Fraud : शेअर मार्केटच्या नावाने महिलेला ४४ लाखांचा गंडा; एका ‘व्हॉट्सॲप ग्रुप’ने केला घात
Share Market Fraud : शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून महिलेची ४३.८७ लाखांची ऑनलाईन फसवणूक; सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
Updated On:

Share Market Fraud – ऑनलाईन ॲपद्वारे शेअर मार्केट गुंतवणुकीचे आमिष दाखवत ४३.८७ लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना सांगवी येथे घडली. स्वाती वर्मा व आर.के. जैन (पूर्ण पत्ता उपलब्ध नाही) व इतर बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने शनिवारी (दि. १४) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १५ डिसेंबर २०२५ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत फिर्यादी महिलेच्या राहत्या घरी ऑनलाइन पद्धतीने घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडून घेतले. त्यानंतर ॲपद्वारे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंतवणूक केलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांच्याकडे अतिरिक्त पैसे मागितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी करीत आहेत.





