शरद पवारांचे विश्वासू शिलेदार ते उदयनराजे भोसलेंना तगडी टक्कर…! शशिकांत शिंदे होणार ‘राष्ट्रवादी’चे नवे प्रदेशाध्यक्ष?

Shashikant Shinde | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत असे समजत आहे. मंगळवारी राष्ट्रवादीची एक बैठक होणार असून त्या बैठकीनंतर शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनीच जयंत पाटील यांनी पदमुक्त करण्याची विनंती केली होती. मला पवार साहेबांनी संधी दिली. सात वर्षांचा काळ दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. त्यांनी निर्णय घ्यावा, अशी विनंती जयंत पाटील यांनी केली होती.
खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले काही महिन्यांपासून प्रदेशाध्यक्षपदाचा वाद चिघळला होता. त्यात मुंबईतील पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या बैठकीत जयंत पाटील यांच्या जागी रोहित पवार किंवा रोहित पाटील यांना संधी द्या, अशी मागणी करण्यात आली होती. यानंतर आता शशिकांत शिंदे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. Shashikant Shinde |
कोण आहेत शशिकांत शिंदे?
राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार मानले जातात. माथाडी कामगारांचे नेते अशीही त्यांची ओळख आहे. शशिकांत शिंदे हे साताऱ्यातील कोरेगाव विधानसभा मतदार संघात कार्यरत आहेत. या मतदार संघातून त्यांनी दोनदा आमदारकी मिळवली होती. शिंदे यांची आक्रमक नेता अशी ओळख आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदार संघातून खासदारकीची उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना कडवी झुंज दिली होती. ,मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. Shashikant Shinde |
या मतदार संघातून त्यांनी दोनदा आमदारकी मिळवली होती.
हेही वाचा:
‘धडक 2’ चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; जात-पातच्या भिंती तोडणारी सिद्धांत-तृप्तीची प्रेमकहाणी





