Sharad Pawar : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सर्वत्र चर्चा आहे. अशातच येथील आमराई परिसरातील PDCC बँक रात्री 11 वाजेपर्यंत उघडी असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. तसेच बारामतीमधील वातावरण चांगलेच तापले होते. ‘सहकार बचाव पॅनल’चे रंजन तावरे यांनी याबाबत अनेक गंभीर आरोप केले आहेत. आता या प्रकरणावर खासदार शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. बॅंकेचे नेतृत्व करणारे लोक आहेत, त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी ती बॅंक कशाला उघडेल, असे शरद पवार म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुक झाली, त्यावेळी बँक उघडलेली होती. आज या बॅंकेमध्ये हे दुसऱ्यांदा हे घडत आहे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये आपल्याला दुसऱ्यांदा दिसते आहे. याचा अर्थ काय समजायचा तो समजा असे विधान शरद पवार यांनी केले आहे. यामुळे त्यांनी केलेल्या विधानाची सर्वत्र जोरदार चर्चा केली जात आहे. रंजन तावरे यांचा आरोप ‘सहकार बचाव पॅनल’चे रंजन तावरे यांनी याबाबत अनेक गंभीर आरोप केले आहेत. पैसे वाटत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. याच बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या यादी देखील सापडल्या असा दावा तावरे यांनी केला आहे. यामुळे बारामतीमधील वातावरण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए सुनील मुसळे रात्री बँकेत काय करत होते, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारी देखील तिथे उपस्थित होते, असा देखील आरोप तावरे यांनी केला आहे. बँकेचा लोड वाढला असावा या प्रकारानंतर आता युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. काल रात्री काही व्हिडीओ आले, त्यांचेही कार्यकर्ते दिसले. तिथे टेबलावर कार्यकर्त्यांना मतदारांची यादी सापडली. या याद्या फक्त माळेगाव कारखान्याच्या नाही तर सहकारी संस्थांच्या यादी देखील असल्याचा दावा युगेंद्र पवार यांना केला आहे. कोणाला काय जबाबदाऱ्या दिल्या होत्या, ते देखील त्या याद्यांवरती नमूद करण्यात आले होते, असे देखील ते म्हणाले आहेत. बँकेचा लोड वाढला असावा, त्यामुळे रात्री 11 पर्यंत हे बँक उघडी असावी अशी खोचक प्रतक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली आहे. हेही वाचा: Uddhav Thackeray : “उंची पेग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा अन् डोळे…; उद्धव ठाकरेंचा नितेश राणेंवर हल्लाबोल