शरद पवार यांची राष्ट्रवादी किती जागांवर विधानसभा लढवणार? जयंत पाटलांनी दिलं उत्तर…

Maharashtra Assembly Elections 2024 । नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. राज्यात या निकालात महायुतीला कमी तर महाविकास आघाडीने जास्त जिंकल्या आहे. अशात आता सर्वच पक्षाकडून विधान सभेसाठी तयार सुरु झाली आहे.
राज्यात येणार विधानसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे. त्यामुळे आता प्रत्यके पक्ष उमेदवारांची चाचपणीसह जागावाटपा बाबत बैठक घेऊन चर्चा करत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आगामी विधानसभेसाठी किती जागांवर आपले शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार? यावर जयंत पाटील यांनी उत्तर दिल आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले,’राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या जागा लढवणार असं जयंत पाटील म्हणाले आहेत. लोकसभेत महाविकास आघाडीला जास्त जागा जिंकता आल्यामुळे आता विधानसभेतही उमेदवारांचा आकडा शरद पवार गटाकडून वाढविण्यात येणार आहे. यशात शरद पवारांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. पण हे वक्तव्य करताना जयंत पाटलांनी जागांचा आकडा मात्र गुलदस्त्यात ठेवल्याचं पाहायला मिळालं.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील…
‘आता साडेतीन-चार महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. आम्ही सर्वच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीत मला आपल्या मतदारसंघात जास्त फिरता येईल, असं वाटत नाही. त्यामुळे काय करायचंय ते तुम्हीच करायचं आहे. कारण लोकसभेत मी दहा मतदारसंघ फिरलो, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, फार प्रचंड काम केल्याशिवाय गडी दुरुस्त होत नाही.” पुढे बोलताना जयंत पाटलांनी विधानसभेच्या जागांबाबचा आकडा घेणं टाळलं आणि म्हणाले की, आकाड घेतला तर टीव्हीवर सुरू होईल, महाविकास आघाडीत राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार, म्हणून मी आकडा घेत नाही.





