मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकीच्या (Municipal Corporation Elections) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ने पहिले महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पक्षाने विभागनिहाय आणि महापालिकानिहाय निवडणूक प्रभारी (Election Incharge) नेमणुका जाहीर केल्या असून, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या खांद्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने ही नेमणुका करण्यात आली असून, स्थानिक युती आघाडीच्या आढाव्यानंतर निरीक्षकांनी अहवाल दिलेला आहे. बहुतांश प्रभारींना त्यांच्या गृह जिल्ह्यातील किंवा प्रभावक्षेत्रातील महापालिकांची जबाबदारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या आघाडीची चाचपणी करण्याची प्रमुख भूमिका आहे. कोणत्या नेत्यावर कोणत्या महापालिकेची जबाबदारी? कोकण विभाग बृहन्मुंबई (BMC) – रोहित पवार ठाणे – डॉ. जितेंद्र आव्हाड नवी मुंबई – शशिकांत शिंदे पनवेल – शशिकांत शिंदे उल्हासनगर – जितेंद्र आव्हाड कल्याण-डोंबिवली – बाळ्यामामा म्हात्रे भिवंडी-निजामपूर – बाळ्यामामा म्हात्रे मीरा-भाईंदर – डॉ. जितेंद्र आव्हाड वसई-विरार – सुनिल भुसारा नाशिक विभाग नाशिक – सुनिल भुसारा अहिल्यानगर – निलेश लंके जळगाव – संतोष दौधरी धुळे – प्राजक्त तनपुरे मालेगाव – भास्कर भगरे पुणे विभाग पुणे – सुप्रिया सुळे (राष्ट्रीय कार्याध्यक्षा) पिंपरी-चिंचवड – डॉ. अमोल कोल्हे आणि रोहित पवार सोलापूर – धैर्यशील पाटील कोल्हापूर – हर्षवर्धन पाटील सांगली-मिरज-कुपवाड – जयंत पाटील इचलकरंजी – बाळासाहेब पाटील मराठवाडा छ. संभाजीनगर – बजरंग सोनवणे नांदेड-वाघाळा – जयप्रकाश दांडेगावकर परभणी – फौजिया खान जालना – राजेश टोपे लातूर – विनायक पाटील विदर्भ – अमरावती विभाग अमरावती – रमेश बंग अकोला – राजेंद्र शिंगणे नागपूर विभाग नागपूर – अनिल देशमुख चंद्रपूर – अमर काळे या नेमणुकीमुळे पक्षाने आगामी महापालिका निवडणुकीसाठी (जानेवारी २०२६) रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक समीकरणे, युती-आघाडीच्या शक्यता आणि विरोधकांच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्यावर भर देण्यात येणार आहे. विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक, नवी मुंबईसारख्या मोठ्या महापालिकांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ही नेमणुकी महत्त्वाची ठरतील.