सोलापूर: राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोलापूर जिल्ह्यात कोरोना दौरा करत आहे. त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे देखील आहेत. दरम्यान, त्यांनी माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांच्या कट्टर विरोधकांच्या भेटीगाठी घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
यावरून राजकीय चर्चा जरी रंगली असली तरी, माळशिरस तालुक्यातील नेते रमेश पाटील यांचे वडील व कण्हेर गावचे माजी उपसरपंच भालचंद्र माणिकराव पाटील यांचे ४ जुलै रोजी दुखःद निधन झाले. त्यामुळे आज शरद पवार यांनी कण्हेर गावी पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
सोलापुरात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या आढाव्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीत बैठकीचे आयोजन करण्यात आले.
राजकीय वर्तुळात चर्चेचं कारण
राष्ट्रवादी काँग्रेसला माळशिरस विधानसभा मतदार संघात मोठा झटका बसला होता. राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पवार भेटींचे वेगळे कयास लावले जात आहेत.
शरद पवार यांनी कण्हेर मधून निघाल्यानंतर डॉ. रामदास देशमुख यांची भेट घेतली. देशमुख हे देखील मोहिते पाटलांचे विरोधक आहेत. त्या ठिकाणी मोहिते पाटलांचे विरोधक कार्यकर्ते पवारांच्या स्वागतासाठी उभे होते. त्यानंतर सोलापूरला जाताना त्यांनी वेळापुरात उत्तम जानकर यांची देखील भेट घेतली. जानकर यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रेवश केला होता. आणि विधानसभा लढवली होती.
वेळापूर येथे उत्तमराव जानकर यांच्या पुढाकाराने आदरणीय खा. पवारसाहेबांच्या (@PawarSpeaks) हस्ते गरजूंसाठी धान्यवाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
याप्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री ना. @bharanemamaNCP, सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. @rajeshtope11 तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/0h5K7tiIwB— NCP (@NCPspeaks) July 19, 2020
माळशिरस तालुक्यातील नेते श्री. रमेश पाटील यांचे वडील व कण्हेर गावचे माजी उपसरपंच भालचंद्र माणिकराव पाटील यांचे ४ जुलै रोजी दुखःद निधन झाले. आज आदरणीय खा. शरद पवारसाहेबांनी कण्हेर गावी पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. pic.twitter.com/EMmPPlwlPT
— NCP (@NCPspeaks) July 19, 2020
आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांच्या अध्यक्षतेखाली, आरोग्यमंत्री ना. @rajeshtope11, सोलापूरचे पालकमंत्री ना. @bharanemamaNCP व लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या आढाव्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. pic.twitter.com/yN8v0FTGTX
— NCP (@NCPspeaks) July 19, 2020