satara | चेतन शिंदे व कुटुंबाच्या पाठीशी राहणार- शरद पवार

फलटण, (प्रतिनिधी) – आगामी काळात चेतन शिंदे यांच्यासह दिवंगत सुभाषराव शिंदे यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा राहणार असल्याची ग्वाही शरद पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचे नुकतेच निधन झाले. शरद पवार यांनी फलटण येथे शिंदे यांच्या निवासस्थानी गुरुवारी भेट देऊन, कुटुंबीयांचे सांत्वन केले. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल देशमुख, राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, सुभाष शिंदे यांचे माझ्या कुटुंबाशी निकटचे संबंध होते. सातारा जिल्ह्यात मी कोणत्याही कार्यक्रमासाठी आलो तरी सुभाष शिंदे जिल्ह्याच्या सीमेवर माझ्या स्वागतासाठी येत. त्यांचा हारसुद्धा ठरलेला असायचा. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे शक्य नाही. आगामी काळात माझ्यासह फलटण तालुक्यातील जनतेने चेतन शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे.





