मंचर, (वार्ताहर)- लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच ज्येष्ठ नेते शरद पवार हे आंबेगाव तालुक्याच्या दौर्यावर शनिवारी (दि. 20) येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली. शरद पवार नेमकं काय बोलणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. शरद पवार हे शनिवारी शासकीय विश्रामगृह मंचरजवळील अवसरी फाटा तांबडेमळा येथे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. जनतेच्या अडीअडचणी जाणून घेणार असून त्यांच्या या दौर्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शनिवारी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत आंबेगाव तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन देवदत्त निकम यांनी केले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे प्रथमच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यात येणार असल्याने या दौर्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.