संजय राऊत घेणार शरद पवार यांची मुलाखत
Updated On:

राज्यातील सत्ता स्थापनेचे कोडे उलगडणार
पुणे – राज्यात महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून सत्तास्थापनेसाठी पडद्याआड राजकीय डावपेचांचा उलगडा स्वत: या सत्तास्थापनेचे शिलेदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीमधून होणार आहे. त्यातही ही मुलाखत विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर चर्चेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत घेणार आहेत.
येत्या 29 डिसेंबरला पुण्यातील यशंवतराव नाट्यगृहात मुलाखतीचा हा सामना पुणेकरांना पहायला आणि ऐकायला मिळणार आहे. 19 वे साहित्यिक कलावंत संमेलन येत्या दि. 28 आणि 29 डिसेंबर रोजी कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे होणार असून यात दुपारी 4 ते सायंकाळी 6 हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.





