Sharad Pawar : वर्धापन दिनाच्या मेळाव्यात शरद पवारांच्या ‘या’ खासदाराने मारली दांडी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 10 जून रोजी वर्धापन दिन साजरा केला जातो. यंदाचा हा 26 वा वर्धापन दिन आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून पुण्यात स्वतंत्रपणे वर्धापन दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शरद पवारांच्या मेळाव्याला त्यांच्या १ खासदाराने दांडी मारली त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली.
‘या’ खासदाराने मारली दांडी
पक्षाच्या वर्धापन दिनाला सुप्रिया सुळे, बाळ्या मामा म्हात्रे, डॉ. अमोल कोल्हे, बजरंग सोनवणे, भगरे गुरूजी, धैर्यशील मोहिते-पाटील आणि निलेश लंके उपस्थित होते तर अमर काळे हे अनुपस्थित होते. एका बाजूला सगळे खासदार एकत्रित असताना दुसरीकडे अमर काळे यांनी वर्धापन दिनाला येणे टाळल्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली.
का मारली दांडी?
वर्धाचे खासदार अमर काळे यांनी सांगितले की, एका संसदीय समितीमध्ये माझा समावेश आहे. या बैठकीच्या निमित्ताने मी सध्या ओडिशामध्ये आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर नेत्यांच्या संमतीने आपण या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शरद पवार गटाकडून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात तर, अजित पवार गटाकडून बालेवाडी मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यंदाच्या वर्धापन दिनाआधीच दोन्ही गट एकत्र येतील असे म्हटले जात होते. मात्र, दोन्ही गटाने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.





