Sharad Pawar: खासदार शरद पवार उपचारासाठी दाखल
Sharad Pawar:

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना छातीत वेदना जाणवू लागल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सर्वसाधारण आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय निरीक्षणासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोग तज्ज्ञ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ के. ग्रँट यांनी अधिकृत निवेदनाद्वारे दिली.
खासदार पवार यांना छातीत श्वास घेताना वेदना (प्ल्युरिटिक पेन) जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय निरीक्षण ठेवण्यात येत आहे.
त्यांची प्रकृती सुधारण्याची अपेक्षा असून, आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि निरीक्षणानंतर पुढील उपचारांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे डॉ. ग्रँट यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.





