Sharad Pawar : शरद पवारांनी तलवारीने केक कापत वाढदिवसाचे केलं सेलिब्रेशन; पाहा Video

Sharad Pawar – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार 12 डिसेंबर रोजी 85 वा वाढदिवस साजरा करत आहेत. ‘शरद पवार’ हे भारतीय राजकारणातील मोठं नाव. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रिय कृषीमंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पेलवल्या आहेत.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. शरद पवार यांच्याकडे पाहिलं की अनेकांना संघर्षाची प्रेरणा मिळते. आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.
दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार यांनीही भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटकरत शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
#WATCH | Delhi: NCP-SCP chief Sharad Pawar cuts a cake as he celebrates his birthday today pic.twitter.com/5FXgxaPu96
— ANI (@ANI) December 12, 2024
दरम्यान, आज सकाळी शरद पवार यांनी दिल्लीत तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी त्यांच्या पक्षातील अनेक नेते मंडळी उपस्थित होते.
Birthday wishes to Rajya Sabha MP and senior leader, Shri Sharad Pawar Ji. I pray for his long and healthy life.@PawarSpeaks
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन मोदींनी पवारांना शुभेच्छा दिल्यात. “राज्यसभेचे खासदार आणि वरिष्ठ नेते श्री शरद पवारजी यांना वाढदिसवाच्या शुभेच्छा. त्यांच्या दिर्घ आणि सुदृढ आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो,” असं म्हटलं आहे.





