शरद पवार म्हणाले,’आमच्या सुप्रियालाही पंतप्रधान मोदींपेक्षा जास्त मताधिक्य मिळालं’

Sharad Pawar । नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालात राज्यात महविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले तर महायुतीला अनेक जागा गमवाव्या लागल्या अशात महायुतीतील अजित पवार गटाला फक्त एकच जागा जिंकता आली. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ सर्वात चर्चेत आला. कारण या मतदार संघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होती
लोकसभेच्या निकालाने शरद पवारांची यावर शिक्कामोर्तब केले आहे. बारामतीच्या जनतेने सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक मताधिक्य देत जिंकवले. याच विजया बाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना देशाच्या पंतप्रधान यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी निवडून आल्या आहेत. अस म्हणत बारामतीतील विजयाचे कोडे सांगितले आहे.
Sharad Pawar । नेमक काय म्हणाले शरद पवार …
इतिहासाचा दाखला देत ते म्हणाले,1967 साली मला कठीण काळात विजयी केले. सोमेश्वर कारखान्याचे बाबलाल काकडे यांच्या विरोधात मला निवडून दिलं. मी नुकताच कॉलेज जीवनातून बाहेर आलो होतो.बारामतीमधील तरुण पिढीने मला नेहमीच साथ दिली आहे.
ते पुढे म्हणाले ,’आजची निवडणूक ही सुप्रिया सुळे यांची चौथी निवडणूक असताना देखील प्रचंड मतांनी विजयी केलं. बारामतीमधील जनतेला कोणतं बटन दाबायच हे सांगावं लागत नाही. देशाचे पंतप्रधान दीड लाख मतांनी निवडून आले आणि सुप्रिया दीड लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आली. देशाच्या पंतप्रधान यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी निवडून आल्या आहेत’





