“हिंदू- मुस्लिमांमधील वातावरण…” ; ‘व्होट जिहाद’वरून शरद पवारांनी फडणवीसांना सुनावले खडेबोल

Sharad Pawar On Devendra Fadnavis। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रत्येक नेत्यांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. त्यातच यंदाच्या निवडणुकीत ‘व्होट जिहाद’ होत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला गेला आहे. त्यांच्या या आरोपांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. भाष्य करताना शरद पवारांनी फडणवीसांना सुनावलं आहे.
यश येणार नाही याची खात्री झाल्याने हिंदू मुस्लिम Sharad Pawar On Devendra Fadnavis।
शरद पवारांनी फडणवीसांवर बोलताना, ‘जिहाद’ हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी काढला. काही मतदारसंघात मायनॉरिटीने महाविकास आघाडीने मतदान केलं. पुण्याच्या काही भागात विशिष्ट समाज आहे. हिंदू समाज आहे. त्यांनी भाजपला मतदान केलं तर आम्हाला सवय आहे. असंच होतं. पण याचा अर्थ जिहाद होतो असं नाही. फडणवीस यांनी जिहाद शब्द वापरला. फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीला धार्मिक कलर देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला यश येणार नाही याची खात्री झाल्याने हिंदू मुस्लिम विषय घेऊन बोलत आहेत. हिंदू आणि मुस्लिमांमधील वातावरण खराब करत आहे, असं शरद पवार म्हणालेत.
.पवारांचा नरेंद्र मोदींवर निशाणा Sharad Pawar On Devendra Fadnavis।
पुढे बोलताना शरद पवारांनी “मी अनेक पंतप्रधानांची भाषणं ऐकली. निवडणुकीच्या काळात. मी कॉलेजात शिकत असताना नेहरुंचे भाषण पुण्यात ऐकलं. त्यानंतर सर्व पंतप्रधानांची भाषणं ऐकली. साधारण उद्याचा विकास कसा असेल. काय कार्यक्रम असेल हे मांडतात. हे पहिले पंतप्रधान मोदी आहेत त्यांनी सुरुवातच केली ४०० पारची. ४०० पार कशासाठी?, “अशा शब्दात टीका केली.
तसेच नरसिंहराव पंतप्रधान होते. आमची मेजॉरीटी नव्हती. त्यांना बहुमत नव्हतं. तरीही सरकार चालवलं. सरकार चालतं. तरीही मोदी ४०० पार मागत होते. याचा अर्थ त्यांचे सहकारी घटनाबदलाचं बोलत होते. संविधानात दुरुस्तीबद्दल बोलत होते. त्यामुळे आम्हाला लोकांना सांगावं लागलं की सरकार काय करणार आहे. आपल्याला भूमिका घ्यायला पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळतेय. अशातच कोणत्या आघाडीला आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याबाबत तर्क लावले जात आहेत. याचबाबत शरद पवारांना विचारण्यात आलं. तेव्हा मी काही ज्योतिषी नाही. निकालानंतर बघू किती जागा येतील, असं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल का? यावरही मी काही ज्योतिषी नाही, असं पवार म्हणाले.





